काहीही झालं तरी आम्ही शिवसेना सोडणार नाही ED चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2022-08-07 05:14 GMT

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजबल होते. त्यानुसार काल वर्षा राऊत यांची ED कडून चौकशी करण्यात आली. तब्ब्ल ८ तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी सुरु होती. चोकशी झाल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी "काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत," असं मत वर्षा राऊत यांनी व्यक्त केलं.

. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. खात्यात कोटयावधी रुपये आले कसे? याच बाबत आता त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ही चौकशी संपल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी माध्यमांशी सुद्धा संवाद साधला यावेळी त्यांना पत्रकारांनी ED कडून चौकशीसाठी परत बोलाव्यात आले आहे का? असा प्रश्न विचारल्या नंतर त्यांनी मला पुन्हा ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही. मात्र, ईडीने पुन्हा चौकशीला बोलावलं तरी मी चौकशीसाठी पुन्हा हजर राहीन असं सांगितले आहे.

Tags:    

Similar News