"चिऊ ताई चिवचिव करणं बंद करा" चित्रा वाघ यांच्यावर नेटकरी भडकले

Update: 2022-05-17 07:02 GMT

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी पुणे दौर्‍यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमस्थळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. बालगंधर्व येथे पार पडलेल्या स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तेव्हा भाजपाच्या पुरुष कार्यकर्त्याने राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्या महिलेला कानशिलात मारल्याचा प्रकार घडला. याचं प्रकारावरून भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत या घटनेचे समर्थन केले आहे. प्रशांत जगताप यांनी ट्विट करत चित्रा वाघ आता या महिला भगिनींच्या मागे उभा राहणार का? असा प्रश्न विचारला होता त्यांच्या या ट्विट चा फोटो शेअर करत चित्रा वाघ यांनी "कार्यक्रमासाठी नाही तर भाजपाचा कार्यक्रम उधळायला आलेल्या अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची असं म्हणायचं आहे का तुम्हाला..?" असं म्हणत या घटनेचे समर्थन केले आहे.

एका महिलेवर एक पुरुष हात उगारतो आणि त्यावर चित्रा वाघ यांनी समर्थन केल्यामुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. चित्रा वाघ यांच्या ट्विटला अनेकांनी उत्तरे दिले आहेत. काय म्हटला हे पाहूयात..

संतोष कोलते ट्विटर वापरकर्ते चित्रा वाघ यांना म्हणतात की, "अहो चित्रा वाघ महिलांवर हात उगारणे कोणत्या सांस्कृतित बसतं ते सांगा..केतकी चितळे सारख्या बाईला आम्ही बडवले असते तर चालले असते का? तुम्ही दुतोंडी बोलु नका थोडी लाज शरम बाळगा"

पंकज या ट्विटर वापरकर्त्याने सुद्धा चित्रा वाघ यांना चांगलं सुनावले आहे ते म्हणतात की, "एखाद्या पुरुषाने महीलेवर हात उचलला ह्याच समर्थन केलंय ह्यांचं सोयीप्रमाणे feminism जागा होत. पातळी इतकी सोडलीये की असल्या गोष्टींचं पण समर्थन जोरदार करताय."

जावेद आकीवाटे म्हणतायत की, "चिऊ ताई चिव चिव करणे बंद करा आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करा फालतू राजकारण करू नका.प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं मिळतात.त्या स्मृती इराणी बाई ला 400/- जास्त आहेत की 1000/- जास्त आहेत ते विचारा."

राज भोईर हे देखील चित्रा वाघ यांच्यावर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी देखील ट्विट करत म्हंटल आहे की, "का साहेबांची राष्ट्रवादी नाही ,हे काय नवीन आता , इथे महिलांवर हात उचलला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे तरी पण एक साधा निषेध पण नाही त्या कार्यकर्ते चा , त्या स्मृती आल्या होत्या तिथे महिलांच्या प्रश्नांवर बोलायला पण महागाई ह्या मुद्यावर त्या काय बोलल्या हे जरा सांगु शकाल का,"

सतीश पाटोदेकर यांनी चित्रा वाघ यांना उत्तर देताना म्हंटल आहे की, ताई संस्कार आणि संस्कृती मध्ये फरक आहे ताई तुमच्या महीलांचा अनादर करण्याची परंपरा आहे भाजपा ची, ताई याच स्मृती बाईनी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविल्या होत्या त्यावेळी त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी मारहाण केली नव्हती.

तर असे अनेक ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर नेटकरी भडकले आहेत. आता काल स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान जो प्रकार झाला याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये सरळ सरळ एक व्यक्ती एका महिलेला कानशिलात लावताना दिसत आहे. बाकी त्या ठिकाणी जो गदारोळ झाला त्याचा तुम्ही विरोध करा पण एका महिलेला एक पुरुष मारहाण करतो आणि चित्रा वाघ या गोष्टीचे समर्थन करतात हे कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा..

Tags:    

Similar News