दिल्ली महानगरपालिकेत (एमसीडी) बुधवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली. आम आदमी पक्षाच्या शैली ओबेरॉय या विजयी झाल्या. यानंतर एमसीडीच्या स्थायी समितीची निवड झाली. सुरवातीला मतदान झाले आणि त्यानंतर एकाच गदारोळ सुरू झाला. AAP आणि भाजप सदस्यांमध्ये हाणामारी झाली. महिला व पुरूष नगरसेवकांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सभागृहात बाटल्या फेकण्यात आल्या आणि मतपेट्या उलटवून टाकल्यात आल्या.
सभागृहात मोबाईल आणण्यावरून गदारोळ..
मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी समिती निवडणुकीदरम्यान काही सदस्यांनी मोबाईल आणले होते. त्यावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. यावरून गदारोळ सुरू झाला. महापौर शैली ओबेरॉय त्यांच्या अध्यक्षस्थानी असताना भाजपचे सदस्य तेथे पोहोचले. यानंतर त्यांनी मतपेटी उलटवली व गदारोळ केला. यानंतर आप आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. सभागृहात सर्वत्र सदस्य एकमेकांशी भांडताना दिसत होते. महिलांनी एकमेकांवर हल्लाही केला. यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.
शैली या केवळ ३८ दिवस महापौरपदावर राहणार आहेत.
शैली ओबेरॉय यांना केवळ 38 दिवस महापौरपद भूषवता येणार आहे. वास्तविक, डीएमसीच्या कलम दोन (67) नुसार, महापालिकेचे वर्ष एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते, जे पुढील वर्षाच्या 31 मार्च रोजी संपेल. अशा स्थितीत, फेब्रुवारीचे पूर्ण 7 दिवस आणि मार्चचे 31 दिवस मिळून त्यांचा कार्यकाळ केवळ 38 दिवस उरला आहे. यानंतर १ एप्रिल रोजी पुन्हा महापौरपदाची निवडणूक होणार आहे.