केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी शेअर केला फेक व्हिडीओ

रेखा शर्मा यांच्यावर ट्वीट डिलीट करण्याची नामुश्की;

Update: 2021-05-12 09:00 GMT

केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमीचं चर्चेत असतात. यावेळी त्या चर्चेत ते त्यांच्या चुकीच्या ट्वीटमुळे.

झालं असं की, एक महिला अत्याचाराचा व्हिडीओ रेखा शर्मा यांनी ट्वीटरवर पाहिला. रामास्वामी नावाच्या ट्वीटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याला कॅप्शन देण्यात होतं. "टीएमसीच्या गुंडांनी भाजपच्या बूथ एजंट स्वाती जेना यांचे अपहरण केले आणि बलात्कार केला. हे सर्व चित्रित केले आणि नंतर त्यांची हत्या केली."

या व्हिडीओची तात्काळ दखल घेत रेखा शर्मा यांनी तो रिट्वीट केला. आणि त्याखाली लीहिलं "पश्चिम बंगाल पोलीस जागे व्हा.. गुंडांच्या संरक्षणासाठी तुम्हाला पगार मिळत नाही. याची आम्ही दखल घेत आहोत."


रेखा शर्मा यांनी महिलांच्या अत्याचारांच्या बाबतीत आपण तात्काळ दखल घेत असल्याचं दाखवंल खरं पण त्यांच्याकडून एक चूक झाली. व्हिडीओची सत्यता न पडताळता त्यांनी तो शेअर केला. पोस्ट केलेला व्हिडिओ मूळचा बांगलादेशचा आहे. पण पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा व्हिडिओ म्हणून तो व्हायरल केला जात आहे.

आपली चूक लक्षात येताच रेखा शर्मा यांनी ते ट्वीट डिलीट केलं. आणि लिहीलं "मी ट्विट हटवलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला हा व्हिडिओ बांगलादेशचा असल्याचे समजले. राष्ट्रीय महिला आयोग पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचाराची चौकशी करीत आहे आणि त्यासाठी आम्ही प्राधिकरणाकडून माहिती मागितली आहे."


Tags:    

Similar News