"तुझी इज्जत लुटतो";राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, गुन्हा दाखल
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन आला असून,"तुझी इज्जत लुटतो" अशी धमकी फोनवरून देण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील टोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलगर यांनी ट्विट करता म्हंटलं होत की,'मला आज सायंकाळी 06:14 वा. 99 223 *** या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता .ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती. आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता,असं सलगर यांनी आरोप केला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा निषेध केला असून,त्यांनी ट्विट करता म्हंटलं आहे की, 'तो कोणीही असो त्याला शिक्षा ही व्हायलाचं हवी, पोलिसात लेखी तक्रार ही कर मी तुझ्या सोबत आहे, अशा पद्धतीत कुणीही महिला/मुलीला धमकावू शकत नाही आणि जो हे करेल त्याला आम्ही सोडणार नाही. हा राजकीय नाही तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी एकत्रित येऊन विकृतांना ठेचू,असं चित्रा वाघ म्हणाल्या.
"तुझी इज्जत लुटतो";राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, गुन्हा दाखल
दोन दिवसांपूर्वी सक्षणा सलगर यांनी ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. तर फक्त जातीवाद वाढवण्यासाठी पडळकर यांना भाजप रसद पुरवत असल्याची टीका त्यांनी केली होती.यावर बोलताना, सक्षणा सलगर म्हणाल्यात की, पडळकर यांना फक्त शरद पवार यांच्यावर बोलण्यासाठी नियुक्ती केलं आहे का? असा प्रश्न पडतो. ते धनगर समाजाच्या प्रश्नावर काही बोलत नाही. मी माझे मत मांडले म्हणून त्यांचे कार्यकर्ते मला फोन करून धमकी देतात. पण आमच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मला फोन करून घाबरण्याचे कारण नाही असे सांगत धीर दिला. त्यामुळे अशा आशा धमक्या देणाऱ्या लोकांना मी घाबरणारी नाही, असंही सलगर म्हणाल्या