"नवनीत राणा आधी खासदारकीचा राजीनामा द्या, आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा"
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकरांनी केली कानउघडणी;
IPS अधिकारी परमविर सिंब यांच्या शंभर कोटी वाल्या लेटर बॉंम्बनंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधी पक्ष गृहमंत्र्यांच्या राजिनाम्यावर ठाम आहे. तर दुसरिकडे लोकसभेतही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली. यात अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा देखील समावेश होता.
खासदार राणा यांच्या या मागणीला उत्तर देताना राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी "नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे." अशा शब्दात कान उघडणी केली आहे.
दरम्यान, सोमवारी लोकसभेत शुन्य प्रहरात खासदार नवनीत राणा यांनी 100 कोटी खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांना हात असल्याचा थेट आरोप करत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.