कंगणाच्या पुरस्कार काढून घ्या व अटक करा' नवाब मलिक यांचा कागणावर निशाणा
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद वाढत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि मंत्री नवाब मिलक यांनी त्यांच्या आयोजित पत्रकार परिषदेत कंगनावर निशाणा साधला. कंगणांचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा आणि तिच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. कंगनाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केल्याचे मलिक यांनी म्हणाले. मलिक टीका करताना कंगना मलाना क्रीम (हिमाचली ड्रग) चा ओव्हरडोज घेऊन वक्तव्य करत आहे असे मला वाटते. अस म्हंटल आहे.
कंगनाने काय विधान केले होते ?
नॅशनल मीडिया नेटवर्कच्या वार्षिक समिटमध्ये कंगना अतिथी वक्ता होती. यावेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सावरकर, लक्ष्मीबाई आणि नेताजी बोस यांचे स्मरण केले आणि ती म्हणाली की, या लोकांना माहित होते की रक्त वाहते, परंतु ते हिंदुस्थानी रक्त नसावे. ते त्यांना माहीत होते. अर्थात त्यांना बक्षीस द्यायला हवे. ते स्वातंत्र्य नव्हते, भिक मागणे होते. आपल्याला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले.