"नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये बॉम्बब्लास्ट घडवून आणले" श्वेता महालेंच खळबळजनक वक्तव्य
"नवाब मलिक कोण आहे, नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडून आणलेत त्या नवाब मलिकला वाचण्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढे आलेले आहे'' आमदार श्वेता महालेंचा नवाब मालिकांवर गंभीर आरोप…;
शिवसेनेचे हिंदुत्व हे फक्त आणि फक्त अंगावर चढवण्यापुरतेच राहिलेले आहे. ज्या दिवशी काँग्रेस सोबत सत्तेत बसले त्या दिवशीच शिवसेनेने हिंदुत्वाला लाथ मारलेली आहे. हिंदुत्वाचा विषय घेऊन बाळासाहेब लढले मोठे झाले मात्र ते हिंदुत्व पक्ष प्रमुख विसरले. वाचण्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढे आलेले आहेत. नवाब मलिक कोण आहे, नवाब मलिक यांनी मुंबईत बॉम्ब ब्लास्ट घडून आणलेत, शिवसेना भवनामध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले. त्या नवाब मलिकला वाचण्यासाठी उद्धव ठाकरे हे पुढे आलेले आहे..उद्याला एमआयएम जरी यांच्या सोबत आली तरी आश्चर्य वाटण्यासारखं त्यात काही राहिलेलं नाही." अस खळबळजनक वक्तव्य महाले यांनी केलं.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर हिंदुत्वावरून जोरदार टीका केली. शिवसेनेचे हिंदुत्व हे ढोंगीपणाचा आहे, ते फक्त बोलण्यामध्ये दिसतं प्रत्यक्ष कृतीमध्ये त्यांचे हिंदुत्व कुठेही राहिलेलं नाही ते हिंदुत्व बाळासाहेबांसोबत निघून गेलेला आहे अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे...