"पठाण"मुळे २५ बंद थिएटर झाली सुरु : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले आहे. 'पठाण' चित्रपट जगभरात धुमाकुळ घालत आहे. बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटामुळे श्रीनगरमधील सिनेमा जगतात बदल झाल्याचे मोदी म्हणाले.
'पठाण' हा चित्रपटात जगभरात सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक नवीन रेकॉर्ड बनवले आहेत. बॉलिवूड कोरोना काळानंतर अर्थिक गर्तेत सापडला होता. मात्र आता त्याला काहीप्रमाणात का होईना, उभारी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. 'पठाण' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमावायला सुरवात केली आहे. 'पठाण' मुळे बॉलिवुडमध्ये एक नवीन जोश पाहायला मिळत आहे.
'पठाण' चित्रपटाने 'केजीएफ' चित्रपटाच्या शेवटच्या दिवसाच्या कलेक्शनला मागे टाकत, मार्केटमध्ये चांगली उभारी घेतली आहे. भारतात 'पठाण' या चित्रपटाने ४५० कोटीपेक्षा अधिकची कमाई केली आहे. तर श्रीनगरमध्ये अनेक वर्षांनंतर 'पठाण' हा चित्रपट हाऊसफुल्ल झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले. शाहरुख खान यांच्या फॅन क्लबने पीएम मोदींच्या संसदेतील भाषणाचा हा भाग ऑनलाईन शेअर करत चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला आहे.
शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या निमित्ताने काश्मीरमधील श्रीनगर येथील आयनॉक्स राम मुन्शी थियेटर तब्बल ३२ वर्षांनी हाऊस फुल्ल झाल्याचे एसआरके युनिव्हर्सने आपल्या ट्विटमे म्हटले आहे. 'पठाण' चित्रपट पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी तीन दशकांनंतर हाऊसफुल्ल गर्दी केली होती. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी 'पठाण' चित्रपट हाऊसफुल्ल होणं ही फार मोठी गोष्ट होती. मोदींनी याच गोष्टीचा उल्लेख करत शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले आहे.
'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे लॉकडाऊन दरम्यान बंद पडलेले २५ सिंगल स्क्रिन थिएटर पुन्हा सुरु होण्यास मदत झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान पीएम मोदींनी आपल्या मंत्र्यांना चित्रपटाच्या तोडफोडीचे समर्थन करु नका आणि 'पठाण' चे शो सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजही 'पठाण' चित्रपट जगभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.