काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नुकतेच दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदनला भेट दिली. महाराष्ट्र सदनात प्रवेश करताना गार्ड ने बाहेर खेळणाऱ्या मुलीला नाना पटोले हे VIP आहेत. त्यामुळं तू थोड्या वेळ बाजूला हो. असं सांगितलं. मात्र, नाना पटोले यांच्यासमोर या मुलीने मी त्यांच्यापेक्षा जास्त व्हीआयपी आहे. असं गार्डला सुनावले.
नाना पटोले यांच्या कानावर हे शब्द पडताच पटोले यांनी त्या मुलीकडे गेले आणि तिची चौकशी केली. तर तिने पुन्हा एकदा मी तुमच्याशी मोठी व्हीआयपी आहे. असं नाना पटोले यांना सांगितले.
यावर नाना पटोले यांनी तिच्याशी संवाद साधला. तिला तिचं नाव विचारलं यावर या मुलीने " तुम्ही मला wish पण केलं नाही. माझा आज हॅपी बर्थ डे आहे. सगळ्यांनी Wish केलं आहे" असं सांगितलं. पटोले यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ तिला उचलून घेतले आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच केक देखील कापला.
सदर मुलीचं नाव शौर्या असून तिची आई सर्वोच्च न्यायालयात रजिस्टर आॅफिसमध्ये काम करते. शौर्या च्या आईचं नाव सोनल पाटील असून त्यांनी महाराष्ट्रात जिल्हा न्यायाधीश म्हणून 12 वर्षे काम पाहिलं आहे. महाराष्ट्रातून या पदापर्यंत पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश आहेत.