"सरकारी विमान हे खासगी कामासाठी नसुन राज्याच्या कामासाठी"
राज्यपाल विरुध्द राज्यसरकार वादात प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रीया;
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी नाकारल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रीया दिली असून त्यांनी 'देशात व्हिव्हिआयपी कल्चर नसले पाहीजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे म्हणणं आहे. राज्यपाल कोश्यारी सरकारी विमान राज्यात कुठेही नेऊ शकतात. मात्र खासगी कामासाठी या विमानाचा वापर करु शकत नाही. सरकारी विमान राज्याच्या कामासाठी आहे. राज्यात कुठेही जाण्यास मनाई नाही. मात्र खासगी कामासाठी वापर करणे चुकीचे आहे', अशी प्रतिक्रीया दिली आहे.