महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलैला घेण्यात येत आहे .अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात येणार होती.त्याप्रमाणे भाजपचे राहुल नार्वेकर यांची रविवारी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला भाजपच्या महिला आमदारही उपस्थित होत्या. त्यापैकी मोनिका राजीव राजळे यांनी एक ट्विट केलं आहे .या ट्विटमध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष दोन दिवसीय अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या भाजप महिला आमदारांचा फोटो आहे.यामद्ये मोनिका राजळेंसोबत ,मेघना बुर्डीकर ,भारती लवेकर , सीमा हिरे आणि मनीषा चौधरी या भाजपच्या महिला आमदार महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला उपस्थित होत्या .
महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष दोन दिवसीय अधिवेशन@BJP4Maharashtra #Maharashtra #VidhanBhavan pic.twitter.com/ffAeBhoJSK
— Monica Rajeev Rajale (@Rajale_Monica) July 3, 2022
एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे यामद्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. रविवारच्या अधिवेशनात शिंदे गट ,भाजप आणि अपक्ष असे मिळून १६४ मतं राहुल नार्वेकर यांना मिळाली . तर महाविकास आघाडीचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली . त्यामुळे भाजपचे राहुल नार्वेकर यांचा विजय झाला .महाविकास आघाडीचे राहुल साळवी पराभूत झाले आहेत.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना सामान न्याय देतील असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा राहुल नार्वेकरांविषयी व्यक्त केला आहे .