आधुनिक भारतीय महिलांमध्ये लग्नानंतर मुलांना जन्म देण्याचीही इच्छा नसते; भाजपच्या मंत्रीमहोदयांची मुक्ताफळं

Update: 2021-10-11 05:38 GMT

आधुनिक भारतीय महिलांना आता एकटे राहायला आवडत आहे. तर उच्चशिक्षित महिलांमध्ये लग्नानंतर मुलांना जन्म देण्याचीही इच्छा नसते. त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात, असा अजब दावा कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले, आज मी माफी मागून सांगतो की, आधुनिक भारतीय महिलांच्या विचारात मोठा बदल होऊ लागला आहे. आधुनिक भारतीय महिलांमध्ये पाश्चात्य देशांचा प्रभाव अधिक दिसतो. त्यामुळे त्यांना आता एकटेच राहावंसं वाटतं. त्यांना लग्नानंतर मुलं जन्माला घालण्याचीही इच्छा नसते. त्या सरोगसीचा पर्याच निवडतात, असं वक्तव्य सुधाकर यांनी केलं आहे.

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्या या अजब दाव्यानंतर आता नवीन वादात भर पडण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या या विधानावरून विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे. एकीकडे महिलांच्या स्वातंत्र्यावर बोलयाच आणि दुसरीकडे त्यांच्यावर टीका सुद्धा करायची अशी टीका आता महिलांकडून होतांना सुद्धा पपाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News