कोल्हापूर शहरातल्या रामानंद नगरमध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेथील 150 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. याठिकाणी कोल्हापूर दक्षिण चे आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती चा आढावा घेतला. तसेच पाण्यात अडकलेल्या लहान मुलं आणि त्यांच्या कुटंबाला स्वतः पाण्यात उतरून महापालिका पथकाबरोबर जाऊन बाहेर काढण्यास मदत केली.