जितेंद्र आव्हाड 'बोले तैसा चाले', आव्हाडांच्या लेकीचा आंतरधर्मीय विवाह संपन्न!

Update: 2021-12-07 12:40 GMT

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाहसोहळा अगदी साधेपणाने पार पडला आहे. एकीकडे राजकीय नेते मोठ्या थाटामाटात आपल्या मुलांची लग्नं लावताना आपल्याला दिसतात मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते.


जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाहसोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. बँडबाजा, वरात असा कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्दतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श कायम केला आहे.


एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. "कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार…घरातील घरपण गेल्यासारखं असेल," हे अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केल्या.



 Full View


Tags:    

Similar News