अखेर एक वर्षानंतर मुंडे बहिण भाऊ एकत्र...
गेल्या वर्षी निवडणुकीअगोदर बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर आज तब्बल एका वर्षानंतर ते एकत्र आले.;
ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नांवर शरद पवार, धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून ऊस तोडणी कामगारांनी पुकारलेला संपही टळला आहे. यावेळी हे दोघेही बाजुबाजूला बसलेले दिसून आले.
ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये 'गोडवा' पाहायला मिळाला. ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. बैठकीदरम्यान पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हास्यविनोद रंगलेले पाहायला मिळाले. गेल्या वर्षी निवडणुकीअगोदर बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावर आले होते. त्यानंतर आज तब्बल एका वर्षानंतर ते एकत्र आले.