यावर्षीचा बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले आहे . या बजेटमध्ये शिक्षण ,आरोग्य तसेच मूलभूत सुविधा ,बेरोजगारी ,गरिबी याच्यावर अनेक योजना सांगण्यात आल्या आहेत. महिलांसाठी हा अर्थसंकल्प किती लाभदायक ठरणार आहे हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेद्वारे सांगितले आहे महिलांना खास बचत योजना जाहीर केले आहे काय आहे हे महिला सन्मान बचत पत्र योजना? आणि यातून काय लाभ महिलांना मिळणार आहे ?जाणून घ्या
यंदा भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या वर्षाचे निमित्त साधून अर्थमंत्र्यांनी आज महिला वर्गासाठी एक खास योजना जाहीर केली आहे. 'महिला सन्मान बचत पत्र' असं या बचत योजनेचं नाव ठेवण्यात आलं आहे.
'महिला सन्मान बचत पत्र' या योजनेअंतर्गत काय लाभ मिळणार ?
१)या योजनेअंतर्गत कोणतीही महिला अथवा तरुणी दोन वर्षासाठी दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम मुदत ठेव म्हणून गुंतवू शकते.
२)या योजनेअंतर्गत त्या महिलेला किंवा तरुणीला गुंतवलेल्या रकमेवर ७.५ टक्के व्याज मिळणार आहे.
३)ही योजना मार्च २०२५ सालापर्यंत चालू राहणार आहे.
४)शिवाय या योजनेत गुंतवलेली अल्प रक्कम मुदतीआधी काढून घेण्याची सुविधा यात ठेवण्यात आली असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर करताना केली आहे