महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही राजकीय उलाढाली होत आहेत . यामध्ये कोण कोणाच्या बाजूने हा सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. उपमुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेत अजित पवार यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. पण अजूनही खातेवाटप झाले नाही आहे. संभाव्य यादी जरी सांगितली जात असली तरी अजूनही खातेवाटप झालेले नाही आहे.
दरम्यान जे आमदार अजित पवार यांना भेटत आहेत त्यांच्याबद्दल मात्र अनेक अफवा उफ़ाळताना दिसत आहेत . त्या किती खऱ्या किंवा खोट्या हे आताच ठरू शकणार नाही . पण प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी एक ट्विट केले आहे ... त्या म्हणतायत , " दादांची भेट घेतली ही बातमी खरी आहे. मात्र भेट कशासाठी घेतली याबाबतच्या अफवांमध्ये काही तथ्य नाही ?"
यादरम्यान महत्वाच्या नियुक्त्या किती झाल्या ?
पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या गटाकडून महत्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचं नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष खा. @praful_patel साहेब, उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks दादा, प्रांताध्यक्ष खा. @SunilTatkare साहेब यांचे मनःपूर्वक आभार..!
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) July 4, 2023
यावेळी ना. @ChhaganCBhujbal… pic.twitter.com/xW8YfDkvlw
या नियुक्तीनंतर चाकणकर यांनी त्यांचे मत मांडले आहे "महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याबद्दल पक्षाचे मनापासून धन्यवाद. महिलांच्या प्रश्नासाठी मी काम करेन. नियुक्तीबाबत मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच पत्र मिळालं आहे. आदरणीय पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. गुरू पौर्णिमेच्या निमत्त त्यांना वंदन करते. इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून हे सगळे प्रश्न पक्षासाठी आहेत, असंही रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या"
अनेक आमदार अजित पवार आणि शरद पवार यांना भेटत तर आहेत . पण त्यामागचे राजकारण किंवा डावपेच सामन्यांना समजत असतील असे नाही . त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे . याच अनुषंगाने प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीनंतर सोनाली तनपुरे यांनी हे ट्विट केलेलं दिसत आहे .