एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात केलेल्या बंडामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना धमकी दिली आहे. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी नवं ट्वीट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड केलं आहे. तर सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहटी येथे आहेत. यापैकी 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिले आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून मृत्यूच्या दारात घेऊन गेलात तरी बेहत्तर अशा शब्दात ट्वीट केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले आहे की,मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर असं ट्वीट केले आहे.
त्याबरोबरच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर.... तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 26, 2022
यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..#MiShivsainik @rautsanjay61
एकनाथ शिंदे यांची विधीमंडळाच्या गटनेतेपदावरूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याबरोबरच त्यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे एकानाथ शिंदे आणि भारत गोगावले यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तर उद्याच या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळणार की दणका हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.