Son of CM कोरोना पॉझिटिव्ह
संपर्कात आलेल्यांना केलं काळजी घेण्याचं आवाहन;
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदीवस वाढत आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यातच एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे सोशल मीडियावर या संदर्भात माहिती दिली आहे.
या पोस्टमध्ये मंत्री आदित्य यांनी "माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या." असं म्हटलं आहे.