समोरनं Propose आलं तेव्हा कुठेतरी बरं वाटलं,रुपाली ठोंबरेंच्या लग्नाची गोष्ट

Update: 2023-05-16 14:10 GMT


रुपाली ठोंबरे म्हणजे जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. पण या ओळखीमागे त्यांचे भन्नाट किस्सेही आहेत. असंच एका रात्रीत कोणी स्टार होत नाही. आणि राजकारण म्हंटलं तर विषयच वेगळा असतो. राजकीय लोकांच्या वैयक्तिक आयुष्यातील कहाण्या सुद्धा तितक्याच रंजक असतात. Maxwoman conclave मध्ये बोलताना रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या लग्नाची कहाणी सांगितली आहे . काय आहे हि स्टोरी ?जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा

रूपाली ठोंबरे पाटील या पुण्यातील सर्वात चर्चित व्यक्ती आहेत . जितके राजकीय नेते कार्यकर्त्यांना मोकळेपणाने बोलतात अगदी त्याच पद्धतीने रूपाली ठोंबरे यांची सुद्धा एक वेगळीच झलक कार्यकर्त्यांमध्ये असते . वडील वकील असल्याने लहानपणापासूनच कायद्याची भाषा त्यांना ज्ञात आहे . स्वतःही त्या न घाबरता नेहमी आंदोलन करतात आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून देतात.

पण हे सगळं करत असताना कित्येकदा जेलमध्ये जाण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले आहेत. लग्न होण्याआधी सुद्धा त्या जेलमध्ये गेल्या होत्या. जेलमध्ये जाऊन आलेल्या मुलगी सोबत कोण लग्न करणार? हा प्रश्न नेहमी लोक त्यांना विचारत असायचे . पण त्यांनी आंदोलन करणं थांबवलं नव्हतं . लग्न आणि त्यांचा राजकीय प्रवास हा निश्चितच कुतूहल वाटावा असाच आहे . पण हा प्रवास त्यांनी Maxwoman conclave च्या कार्यक्रमात सांगितला आहे . त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल पुढील किस्सा सांगितला आहे .

त्या म्हणतात कि , "माझं लग्न म्हणजे मी सोडून दिलं होतं . तर तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. समोरनं propose आलं तेव्हा कुठेतरी बरं वाटलं मग ते समोरनं propose आल्यानंतर मी लग्न केलं . मला दोन मुलं म्हणजे मला बारा वर्षाची मुलगी आहे सहा वर्षाचा माझा मुलगा आहे . पण स्वतःच्या कामातून सुद्धा मला नवऱ्यानी राजकारणामध्ये साथ दिली. म्हणजे माझी मुलगी दोन वर्षाची असताना मी चांदणी चौकातला toll फोडला होता. तेव्हाही दोन दिवस मी lockup मध्ये होते . तेव्हा माझा नवरा बिचारा घरी रडत होता.पण मी इथनं lockup मध्ये गपचूपमध्ये जरा बाहेर येऊन phone करून सांगितलं रडू नको मी येणार आहे उद्या ,काळजी करू नको. म्हणजे हे करावं लागतं .राजकारणात सुद्धा छान गोष्टी करता येतात.सक्षमपणे करता येतात. फक्त संधी देणार्यांनी पण दिली पाहिजे."

रुपाली ठोंबरे यांनी स्वतःच्या भाषेत हा किस्सा सांगितलं आहे ,असे अनेक किस्से आम्ही घेऊन येऊच ,तोवर हा किस्सा कसा वाटला प्रतिसाद नक्की कळवा .

Tags:    

Similar News