धुनी-भांडी करणाऱ्या महिलेला तिकीट ; लालू प्रसाद करू शकतात मग इतर पक्ष का नाही?

Update: 2022-05-31 15:23 GMT

आरजेडीने काल सोमवारी विधान परिषदेसाठी (एमएलसी) उमेदवारांची घोषणा केली. आरजेडीने यावेळी मोहम्मद कारी , मुन्नी देवी आणि अशोक कुमार पांडे यांना तिकीट दिले आहे. या सगळ्या मध्ये आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यांचा हा उमेदवार निवडीबाबतचा निर्णय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

त्याच करण अस की, यावेळी लालूंनी कपडे धुणाऱ्या मुन्नीदेवीवर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले आहे. या सगळ्या निवडीनंतर मुन्नी देवी यांनी मीडियाशी बातचीत केली. यावेळी अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेली मुन्नी मीडियाशी बोलताना भावूक झाली. ती म्हणाली की, "आज मी खूप आनंदी आहे. मी अनेक वर्षांपासून राजदशी संबंधित आहे. लोक माझ्यावर हसायचे. ते म्हणायचे की लालू स्वतः घोटाळा करून तुरुंगात गेले आहेत. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मी माझे काम सुरू ठेवले व आज पक्षाने माझ्या कामाची दखल घेत माझ्यावर विश्वास दाखवला आहे."

यापुढे बोलताना मुन्नी सांगते की, "माझ्याकडे मोबाईलही नाही. सोमवारी दुपारी काही कार्यकर्त्यांनी मला गाठले आणि सांगितले की, तुम्हाला राजदकडून भेट मिळाली आहे. याच लोकांनी मला राजद कार्यालयात आणले. यावेळी मी पटना येथील खुसरुपूर रेल्वे प्लॅटफॉर्मखाली कपडे धुत होते. मी महिलांना खासकरून महिलांना सांगते की, तुम्ही स्वतः कमवा आणि मुलांना शिक्षण द्या.

धुनी-भांडी करायचो म्हणून लोक माझ्यावर हसायचे..

तिकीट मिळण्याची आशा होती का? असा प्रश्न मुन्नीला विचारला असता त्या म्हणाल्या की, लोक माझ्यावर हसायचे, पण राजदचे कार्यकर्ते मजबूत आहेत. मुन्नी मीडियाशी बोलत होती तेव्हा तिच्या हातात गीता होती. पत्रकारांनी त्यांना विचारले तुम्हाला गीता कोणी दिली? मुन्नी हसली आणि शेजारी उभ्या असलेल्या तेज प्रतापकडे बघून म्हणाली, तेज भैय्याने दिले आहे. मी माझ्याकडे ठेवतो. महागाई कमी करण्यासाठी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मुन्नी म्हणाली. मुन्नीने लालू यादव, राबडी देवी, मिसा भारती, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांना एमएलसी तिकीट दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

Tags:    

Similar News