राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबईचा विचार केला तर दररोज कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात मुंबई 20 हजारपेक्षा जास्त कोरोना (Corona) बाधित रुग्णांची संख्या आढळली आहे. कोरोनाची संख्या आता 20 हजारांच्या पुढे गेली आहे. मागे झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील रुग्णसंख्या 20 हजारांच्या पुढे गेली तर लॉकडाउनचा विचार केला जाईल असं म्हंटल होत.
कालची रुग्णसंख्या पाहिलं तर काल मुंबईत 20 हजार 181 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबई लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. आज किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली व यावेळी त्यांनी सध्यातरी पूर्ण लॉकडाऊन लागू केला जाणार नसून मिनी लॉकडाऊनवर विचार केला जात असल्याची माहिती दिली आहे.