भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेशी व्हिडिओ चॅट करणारा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजलीय. या व्हिडिओची मॅक्स महाराष्ट्र पुष्टी करत नाही. लोकशाही मराठी या न्यूज चॅनेलनं दाखविलेल्या बातमीच्या आधारे ही बातमी आम्ही देत आहोत. या बातमीतील व्हिडिओची आम्ही खात्री केलेली नाही. केवळ बातमी देणं हाच एकमेव उद्देश आमचा या बातमीमागे आहे.
कित्येक राजकीय नेत्यांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओचं लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणलाय. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरूय. अशा परिस्थितीत विरोधकांना यानिमित्तानं सरकारला घेरण्यासाठी आयतं कोलीतच मिळाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओ चॅटमध्ये किरीट सोमय्या हे एका महिलेसोबत बोलतांना दिसत असून संबंधित महिलेचा चेहरा हा ब्लर करण्यात आलाय. यावेळी सोमय्या यांच्या चेहऱ्यावर अश्लील हावभाव दिसत आहेत. अशाप्रकारे सोमय्यांचा सहभाग असलेल्या जवळपास ८ तासांच्या व्हिडिओ चॅटच्या क्लिप असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीनं केलाय.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ भाजपनेच व्हायरल केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना सुषमा अंधारे म्हणतायत की, किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे पण भाजपने अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवले आहेत. त्या व्हिडिओ बाबत चर्चा करावी असा हा व्हिडिओ नाही. महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे मात्र हा व्हिडिओ देखील भाजपनेच व्हायरल केला असल्याचं त्यांनी म्हंटल आहे...