सोमय्यांचा कथित व्हिडीओ विधानसभा गाजवणार?

Update: 2023-07-18 07:45 GMT


भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेशी व्हिडिओ चॅट करणारा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कित्येक राजकीय नेत्यांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओचं लोकशाही वृत्तवाहिनीनं समोर आणला आहे . सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 

अशा परिस्थितीत विरोधकांना यानिमित्तानं सरकारला घेरण्यासाठी आयतं कोलीतच मिळाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओ चॅटमध्ये किरीट सोमय्या हे एका महिलेसोबत बोलतांना दिसत असून संबंधित महिलेचा चेहरा हा ब्लर करण्यात आलाय. यावेळी सोमय्या यांच्या चेहऱ्यावर अश्लील हावभाव दिसत आहेत. अशाप्रकारे सोमय्यांचा सहभाग असलेल्या जवळपास ८ तासांच्या व्हिडिओ चॅटच्या क्लिप असल्याचा दावाही या वृत्तवाहिनीनं केला आहे. 

किरीट सोमय्या यांच्या या कथित व्हायरल व्हिडिओ नंतर आता सभागृहात सुद्धा या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले होते. मात्र काहीच वेळात अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू झाला आहे आणि आज दिवसभरात किरीट सोमय्या यांचा जो कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे..

Tags:    

Similar News