मंत्री अदिती तटकरेंची रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस...

Update: 2023-07-20 10:37 GMT
मंत्री अदिती तटकरेंची रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस...
  • whatsapp icon

रायगड खालापूर तालुक्यातील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी असून दरड येथील रहिवासी घरांवर कोसळली आहे. 90% वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे. 30 ते 35 आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. जवळपास 50 हून अधिक लोक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.

घटनास्थळी बरेच मंत्रीमहोदय पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विभागीय आयुक्त, उदय सामंत, दादा भुसे, आदिती तटकरे असे सगळे लोक तिथे आहेत. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. या सगळ्या घटनेनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे रात्रीपासून घटनास्थळी आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची त्यांनी रुग्णालयात जाऊन देखील भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांनी जखमींची विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या दुर्घटनेतील जखमी नागरिकांना रुग्णालयात आणलं जाईल. त्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाने सज्ज राहावं, अशा सूचना आदिती यांनी यावेळी दिल्या...

Tags:    

Similar News