सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचे विचार बरे नाहीत...रेकॉर्डींग शरद पवारांना ऐकवणार- करूणा मुंडे
मॅक्स वुमनवर रूपाली ठोंबरेशी चर्चा करताना करूणा मुंडे यांनी सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंच्या विचारसरणाीबाबत मोठा खुलासा केला..;
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनी मॅक्स वुमनशी संवाद साधताना धनंजय मुंडे सोबतच सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावरही भेट देत नसल्याची टीका केली होती. त्याच प्रकरणी मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्या ऍड. रूपाली ठोंबरे पाटील आणि करूणा मुंडे यांची चर्चा मॅक्स वुमनने घडवून आणली. या चर्चेत बोलताना करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची सुप्रिया सुळे यांच्याबाबतीत विचारसरणी बरी नाही असा खुलासा केला इतकंच नाही तर त्याबद्दलची रेकॉर्डिंगही त्यांच्याकडे असून ती शरद पवारांना ऐकवणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मदत न केल्याने करूणा मुंडेंनी धनंजय मुंडेवर अनेक आरोप केले होते. या सोबत त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर देखील आरोप केले होते. त्याबद्दल रूपाली ठोंबरेंशी चर्चा करताना करूणा मुंडे यांनी आणखी काही खुलासे केले. धनंजय मुंडे यांनी स्वतः माझी आणि मुलांची भेट सुप्रिया सुळे आणि शरद पवारांशी घालून दिली होती पण त्यांना जेव्हा अटक झाली तेव्हा आपल्याच एका नेत्याची पत्नी म्हणून शरद पवारांना साधी विचारपूसही करावीशी वाटली नाही याबाबतीत खंत व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यावर रुपाली पाटील यांनी त्यांना स्वतःसुध्दा कधी भेट मिळत नसल्याचे सांगितले आणि करूणा मुंडेंनी कधी भेट मागितली का असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना करूणा मुंडे म्हणाल्या की सुप्रिया सुळेंना मी चार ते पाच फोन केले पण त्यांनी एकदाही त्यांनी कॉलबॅक केला नाही. तेच शरद पवारांना कॉल केले तर त्यांच्या ऑफीसवरून मला बोलावणं आलं आणि मी धनंजय मुंडे ना सांगितलं. हाच माझा मुर्खपणा ठरला असं त्या म्हणाल्या. कारण यानंतर मला पुन्हा शरद पवारांचा फोन आला आणि त्यांनी भेट नाकारली.
इतकंच नाही तर सुप्रिया सुळेंबाबत धनंजय मुंडेंचं मत, विचारसरणी काही बरी नसल्याचा खुलासा त्यांनी केला. आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी त्याच्याबाबतीत आणखी खुलासा करण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला आणि सदर रेकॉर्डिंग थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना ऐकवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.