"माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डींग्स आहेत" राष्ट्रवादीबाबत करूणा मुंडे यांचे खळबळजनक वक्तव्य..

Update: 2022-04-17 15:07 GMT

उत्तर कोल्हापुर पोटनिवडणूकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. मात्र जयश्री जाधव यांच्या विजयापेक्षा करुणा मुंडे यांच्या लढण्याची सर्वात जास्त चर्चा झाली. त्यामुळे या संपुर्ण निवडणूकीसह करुणा मुंडे यांनी कशा पध्दतीने निवडणूक लढवली? याच्यासह करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. त्याबाबत #MaxWoman शी बोलताना करुणा मुंडे यांनी बोलताना सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीवर देखील खळबळजनक आरोप केले आहेत.

आजपर्यंत कोणी सुद्धा मला व धनंजय मुंडे यांना घरी बोलवून तुमच्यामध्ये काय भांडण चालू आहे याबद्दल विचारण्याचे किंवा यावर बोलण्याचे सौजन्य सुद्धा केलं नाही आहे. आज आमच्यामध्ये इतकं भांडण सुरू असताना देखील मला जेलमध्ये टाकण्यात आलं. पण मला एका नेत्याचा सोडा पण एक महिला म्हणून सुद्धा कोणी माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत.

एक महिला म्हणून सुप्रिया सुळे व शरद पवार यांनी मला व धनंजय मुंडे यांना बोलून एकदाही काय चालू आहे याबद्दल साधा विचारलं सुद्धा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज इतकेही माणुसकी नाही का? धनंजय मुंडे यांना पक्षाचा पूर्ण सपोर्ट आहे. पार्टीचा सपोर्ट का आहे? हे देखील मी आता सर्वाना सांगणार आहे. या सगळ्याचं रेकॉर्डिंग माझ्याजवळ असल्याचा खळबळजनक खुलासा करुणा धनंजय मुंडे यांनी #MaxWoman शी बोलताना केला आहे.


Full View

Tags:    

Similar News