मिस इंडिया २०२२ ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे.३ जुलै रोजी मुंबईत मिस इंडिया २०२२ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत .अंतिम फेरीत ३१ स्पर्धकांवर मात करत कर्नाटकच्या सिनी शेट्टीने मिस इंडियाचा मुकूट आपल्या नावावर केला आहे. तर,अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनर अप व उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी आली आहे.
सिनी शेट्टी २१ वर्षांची आहे. तिला भरतनाट्यमची आवड असल्याने भारतनाट्यमचे धडेही तिने गिरवले आहेत . तसेच तिने अकाउंटिग व फायनान्समध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आहे.वयाच्या चौदा वर्षापर्यंत सिनीने अनेक स्टेज शो केले आहेत.सिनी कर्नाटकात राहते पण तिचा जन्म हा मुंबईतच झाला आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेशन्समध्ये मिस इंडिया २०२२चा अंतिम सोहळा पार पडला.या सौंदर्य स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या बुद्धिमतेने आणि सौंदर्याने परीक्षकांची मन जिंकली आहेत. सिनी शेट्टी विजेती ठरली असून राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनरअप आणि उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी आली आहे.
जिओ वर्ल्ड कन्व्हेशन्समध्ये हा सोहळा रंगला होता .या सोहळ्यासाठी ६ परिक्षकांच्या पॅनेल होते. परीक्षकांनी विजेतीची निवड केली. परिक्षकांच्या पॅनेलमध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दरम्यान, नेहा धुपियाला या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकून २० वर्ष पूर्ण झाली त्यांचंही सेलिब्रेशिन काल रंगलेल्या सोहळ्यात करण्यात आलं.
या स्पर्धेला फेमिना मिस इंडिया का म्हणतात ?
ही भारत देशात भरवली जाणारी वार्षिक सौंदर्य स्पर्धा आहे. १९५२पासून सुरू झालेली ही स्पर्धा सुरुवातीस मिस इंडिया या नावाने होत. १९६३ सालापासून या स्पर्धेचे आयोजन टाइम्स समूहामधील फेमिना हे मासिक करते. म्हणून या स्पर्धेचे नाव फेमिना मिस इंडिया आहे. ह्या स्पर्धेत एकूण तीन विजेत्या महिला निवडल्या जातात. फेमिना मिस इंडिया वर्ल्ड मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये, फेमिना मिस इंडिया अर्थ मिस अर्थ स्पर्धेमध्ये तर फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल मिस इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करते. २००५ सालापर्यंत फेमिना मिस इंडियाकडून मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल तसेच २००९ सालापर्यंत मिस युनिव्हर्स ह्या स्पर्धांसाठी स्पर्धक पाठवल्या जात होते .