आधुनिक जनरल डायर सरकारच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने सहभागी व्हा: यशोमती ठाकूर
लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यात आज महाविकास आघाडीकडून बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासूनच राज्यात जवळपास सर्वच भागात बंदला प्रीतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच बंदमध्ये सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आवाहन सुद्धा केले जात आहे. तर आधुनिक जनरल डायर सरकारच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे म्हणत कॉंग्रेस नेत्या आणि महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
यशोमती ठाकूर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, " उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करण्याऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा आज महाराष्ट्र_बंद!, मोठ्या संख्येने सहभागी व्हा.." असं आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करण्याऱ्या आधुनिक जनरल डायर योगी सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा आज #महाराष्ट्र_बंद!
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) October 11, 2021
मोठ्या संख्येने सहभागी व्हा!#MaharashtraBandh pic.twitter.com/hLLHI6dGag
राज्यात आज सकाळपासून बंदला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तर बंदमुळे पुण्यातील पीएमपीएल बससेवा सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.बीडमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत.Maharashtra