''कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही'' जावेद अख्तर असं का म्हणले पहा..

Update: 2023-02-23 06:18 GMT

प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी लाहोरमधील आयोजित ‘फैज फेस्टिवल २०२३’ मध्ये, ''मुंबई हल्ल्याचे सूत्रधार पाकिस्तानात मोकळेपणाने फिरत आहेत. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते'' असं म्हणत या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल टोला लगावला होता. याबद्दल त्यांचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे. पाकिस्तानातील लाहोरमध्ये १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित 'फैज फेस्टिव्हल'मध्ये जावेद अख्तर पोहोचले होते.

भारतात परतल्यावर जावेद अख्तर यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत लाहोरमध्ये आलेल्या प्रतिक्रियांबद्दल सांगितले. जावेद अख्तर एका मुलाखतीत म्हणाले- सभागृहात उपस्थित लोकांनी माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवली आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. भारताची स्तुती करणारे अनेक लोक आहेत. त्यांना भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. आपण अशा जगाबद्दल बोलतो जिथे कोणतीही विभागणी नाही. पाकिस्तानातील लाखो लोकांना आपल्यासोबत कसे जोडायचे याचा विचार केला पाहिजे.

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री कंगना रानौत काय म्हणाली..

“जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा असं वाटतं की कशी सरस्वती मातेने यांच्यावर एवढी कृपा केली आहे. पण पाहा काहीतरी प्रामाणिकपणा असतोच माणसात. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलात. हाहाहा” असं कंगना रणौतने कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत म्हंटले आहे.


कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही - जावेद अख्तर

“कंगनाच्या कौतुकाने मला काही फरक पडत नाही. काळजी करू नका हे काही काळासाठीच आहे. खरं तर मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही. ती बोलली ते विसरून जा असं प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांनी कंगनाची कौतुक करणाऱ्या पोस्ट नंतर एका वृत्तवाहिनीवर झालेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.. 

Tags:    

Similar News