राज्यात कोरोनाचे संसर्गाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला लागल्याने सरकार दक्ष झाले. या संदर्भात अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी आपलं मत व्यक्त केलं.
त्या म्हणाल्या "अमरावतीत लॉकडाउन लागल्याने लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पालक मंत्र्यांनी स्थानीक लोकप्रतिनिधींना विश्वात न घेता हा निर्णय घेतला. त्यामुळे आता जवळपास 40 ते 50 टक्के लोकांवर उपासमारिची परिस्थिती निर्माण झालेय. त्यामुळे आता लॉकडाउन करन काही होणार नाही तर आरोग्य सेवा वाढवणं काळाची गरज बनलेय."