फडणवीस उपमुख्यमंत्री होताच आश्विनी भिडे यांची पुन्हा चर्चा..

Update: 2022-07-02 05:47 GMT

मुंबई मेट्रोच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली जाऊ शकते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अश्विनी भिडे यांना या पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रोच्या अध्यक्षपदी निवड केली जाऊ शकते.



 अश्विनी भिडे या फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो-3 या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि ठाकरे सरकार सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांनी आरे मधून कारशेड हटवण्याचा निर्णय घेतला. आरे ऐवजी कांजूरमार्ग या ठिकाणी हे कारशेट करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि याच वेळी अश्विनी भिडे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. सध्या त्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आरे याच ठिकाणीच मेट्रोचं कारशेड होईल असं म्हंटल आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आश्विनी भिडे यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.




 


Tags:    

Similar News