लोकसभेत नवनीत राणा यांचे केवळ ५३ प्रश्न, पटकावला खालून दुसरा क्रमांक
लोकसभेत नवनीत राणा यांनी केवळ ५३ प्रश्न उपस्थित केले. प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या यादीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी खालून दुसरा क्रमांक
लोकसभेत प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या यादीमध्ये खासदार नवनीत राणा यांनी शेवटून दुसरा क्रमांक पटकावला आहे. संसदेच्या माध्यमातून आपापल्या विभागातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नेहमीच प्रयत्नशील असतात. अशा खासदारांनी जनहिताचे किती प्रश्न विचारले याची यादी उपलब्ध असते. मात्र महाराष्ट्रातील इतर खसदारांच्या यादीमध्ये नवनीत राणा यांनी अतिशय सुमार कामगिरी केल्याचे यातमधून दिसून येते.
लोकसभेमध्ये प्रश्न विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या यादीमध्ये सोलापूरच्या खासदारांनी सर्वांत कमी प्रश्न विचारले आहेत. तर सर्वात जास्त प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी विचारले आहेत. त्यांनी सर्वाधिक 402 प्रश्न विचारले आहेत. त्या खालोखाल सुप्रिया सुळे यांनी 400 प्रश्न, तर अमोल कोल्हे यांनी 397 प्रश्न विचारले आहेत.
सर्वात कमी म्हणजे केवळ 31 प्रश्न विचारणारे हे सोलापूरचे खासदार महास्वामी जयसिद्धेश्वर आहेत. तर त्यांच्यापेक्षा थोडी चांगली कामगिरी करणाऱ्या खासदार या अमरावतीच्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी केवळ 53 प्रश्न उपस्थित केले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची संसदेतील एकूण कामगिरी अतिशय सुमार दर्जाची आहे. अनेक महत्वांच्या चर्चांमध्ये त्या कधीही सहभाग घेत नाहीत असेच स्पष्ट होते. लोकसभेत नवनीत राणा यांनी जनहिताचे प्रश्न कमी आणि भाजपाला समर्थन देण्यासाठी जास्त वेळा आवाज ऊठवला आहे.
महिला प्रश्नांवर देखील खासदार नवनीत राणा गप्प
संसदेत लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यात महिला खासदार म्हंटल तर महिलांचे प्रश्न मांडले जातील याची सर्वांना अपेक्षा असते. तस पाहिलं तर संसदेत पहिलाच महिलांची संख्या कमी आहे. अशा वेळी महिलांचे प्रश्न प्रामुख्याने महिला खासदारांनी मांडले पाहिजेत. खासदार नवनीत राणा यांनी महिलांचे किती प्रश्न उपस्थित केले? महिलांच्या कोणत्या मुद्यावर त्यांनी संसदेत आवाज उठवला? खरतर एक महिला खासदार म्हणून महिलांचे प्रश्न त्यांच्याकडून संसदेत मांडले जावेत अशी अपेक्षा होती. मात्र खासदार नवनीत राणा यांनी महिलांचे तर नाहीच पण आपल्या मतदार सांगतील सुद्धा प्रश्न उपस्थित केले नाहीत. कुठल्याही खासदारांचे काम हे त्याने संसदेत उपस्थित केलेल्या प्रशांवरून ठरत असते. नवनीत राणा यांनी केवळ 53 प्रश उपस्थित केले. त्यामुळे इतर वेळी आक्रमक होणाऱ्या खासदार राणा संसदेत गप्प का?