योगी आदित्यनाथ यांना प्रतिउत्तर देण्यासाठी प्रियांका गांधी यांनी पुन्हा हातात घेतला झाडू....

Update: 2021-10-09 06:50 GMT

मागच्या काही दिवसांपूर्वीच प्रियांका गांधी यांनी गेस्ट हाऊस मधील खोलीची साफसफाई केली होता. लखीमपूर खेरी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी निघाल्या होत्या. यावेळी त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले आणि त्यानंतर सीतापुर इथल्या गेस्ट हाऊसवर काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी ज्या खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते त्या खोलीची साफसफाई करत असतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता.

प्रियांका गांधी सफाई करत असलेल्या व्हिडिओवरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'काँग्रेस नेत्यांना तेवढच करायच्या उपयोगाचे ठेवायची जनतेची इच्छा आहे. आणि ते जनतेने त्यांना करायला लावले आहे. या लोकांना उपद्रव करणे आणि नकारात्मकता पसरवणे यापेक्षा दुसरे काहीच काम उरले नाही.' अशी प्रतिक्रिया दिली होती.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या प्रतिक्रियेनंतर काल प्रियांका गांधी यांनी पुन्हा हातात झाडू घेऊन लखनऊ मधील वाल्मीकी मंदिरात साफसफाई केली. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वर त्यांनी 'योगी आदित्यनाथ यांनी असं बोलून फक्त माझाच नाही तर सगळ्यांचा अपमान केला आहे. कारण कोट्यावधी दलित बंधू-भगिनी सफाई कर्मचारी आहेत. ते हे काम करतात. योगी आदित्यनाथ यांनी जे विधान केले त्यामुळे आपण हातात झाडू घेऊन वाल्मिकी मंदिरात सफाईचा निर्णय घेतला. कारण यामध्ये अयोग्य अस काहीच नाही हे मला त्यांना दाखवायचे होते.' असे त्यांनी म्हटले आहे.

खरं तर उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर खेरी या ठिकाणी जी घटना घडली त्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. ते दोघे त्यांना भेट घेण्यासाठी जात होते तेव्हा अनेक ठिकाणी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या प्रकरणावरून प्रियांका गांधी सातत्याने उत्तर प्रदेश सरकारवर टीका करत आहेत.

Tags:    

Similar News