डिसले गुरुजींचा सत्कार मी कधी विसरु शकणार नाही

Update: 2020-12-15 10:45 GMT

ग्लोबल टीचर पुरस्कारचे मानकरी ठरलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजींचा अभिनंदन प्रस्ताव आज विधान परिषदेत माडण्यात आला. डिसले गुरुजींचे कौतुक करताना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या भेटीचा किस्सा सांगीतला.

निलम गोऱ्हे म्हणाल्या की, "डिसले गुरुजींना फोन करुन अभिनंदनासाठी मी त्यांना विधान भवनात बोलावलं. त्यांचा सत्कार केला. पण त्यांची भेट आणखी एका गोष्टीमुळे विसरु शकत नाही. कारण, आमच्या कार्यालयातील अनेकांनी त्यांच्या सोबत फोटो काढले. मी सुध्दा मास्क न काढता फोटो काढला. दुसऱ्याच दिवशी गुरुजी कोरोना बाधीत असल्याची बातमी आली आणि आम्हाला सर्वांना तिन दिवस आयसोलेशनमध्ये रहावं लागलं. त्यामुळे डिसले गुरुजींचा सत्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहे." असं त्यांनी म्हटलं आहे.


Tags:    

Similar News