"माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले" चित्रा वाघ यांचे पुणे पोलिस आयुक्तांना पत्र..

"रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत. मी पिडीतेला सर्वतोपरी मदतचं केली तरीही माझ्यावरच खोटे आरोप केले गेलेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी" चित्रा वाघ यांचे पुणे पोलीस आयुक्तांना पत्र

Update: 2022-04-18 08:12 GMT

 शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत याची सखोल चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. राज्यभरात गाजत असलेलं रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पिडीतेने, "रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला मला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं त्यासाठी त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी देखील दिली असे खळबळजनक आरोप केले आहेत. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

काय म्हंटल आहे चित्रा वाघ यांनी पत्रात..

माझ्यावर आरोप करण्यासाठी पीडितेवर आरोप करायला दबाव टाकला जात असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला असून कुचीक यांचा जामीन रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे आहेत. मी पिडीतेला सगळ्या पद्धतीने मदतचं केली आहे पण तरी देखील माझ्यावरच खोटे आरोप केले गेले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी ही मागणी मी पुणे पोलिसआयुक्त ना मेल/लेखी अर्जाद्वारे करत आहे. पोलिस सखोल चौकशी करतील हि अपेक्षा आहे असं चित्रा यांनी म्हंटल आहे. त्यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालकांना देखील पाठवले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचीक यांच्यावर एका मुलीशी लग्नाचे आम्हीच देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात केली होती. हे प्रकरण भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पिडीतेने नेमके काय आरोप केले?

"मला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं गेलं होतं. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं होतं. याशिवाय मी जर कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू", अशी धमकी दिल्याचे आरोप पिडीतेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर लावले आहेत.

याशिवाय महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणेचा वापर करून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज केले गेले आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.

Tags:    

Similar News