हिना गावितांचा भाजप पक्षाला रामराम

Update: 2024-11-05 09:21 GMT

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार हिना गावीत यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. डॉ. हिना गावित या अक्कलकुवा मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होत्या. त्यांनी तेथे भाजपकडून उमेदवारी मिळण्याची वरिष्ठांकडून मागणी देखील केली होती.

दरम्यान डॉ. हिना गावित म्हणाल्या की, "तेथील जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे राजीनामा दिला आहे. परंतु राजीनामा देण्याचे कारण वेगळे असून, भाजपचे मित्र पक्ष असलेले शिवसेना ही सातत्याने भाजपच्या विरोधात प्रचार करत आहे. महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा नेते विरोधी काँग्रेस पक्षाला सर्वकाळ मदत करत आहेत. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करून भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा मतदारसंघात देखील उमेदवारी मिळू नये इथपासून तर पराभूत करण्यापर्यंत त्यांनी भूमिका बजावली आहे. तरीही वरिष्ठ स्तरावरुन त्यांना आवर घालण्यात आलेला नाही. हेच आता विद्यमान विधानसभा निवडणुकीत सुद्धा घडवले जात आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार करून भाजपचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून जर मी निवडणूक लढवली तर भारतीय जनता पार्टीचा एक आमदार वाढू शकतो, म्हणून मी उमेदवारी मागितली तरी शिंदे गटाच्या शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांचा आग्रह धरून शिवसेनेला जागा दिली. शिवसेनेसंदर्भात सर्व राजकीय घटनाक्रम पक्षातील वरिष्ठांना निदर्शनास आणून दिले तरी देखील त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, म्हणून मी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे जबाबदार सदस्य असताना महायुतीमधील वातावरण बिघडू नये यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. हिना गावित यांनी सांगितले आहे.

Full View

Tags:    

Similar News