अर्थव्यवस्थेला 'शवासन' करायला लावणाऱ्या पंतप्रधानांना योगदिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा पंतप्रधानांना टोला

Update: 2021-06-21 06:15 GMT

21 जून हा दिवस अंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. पण या योग दिनाला राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या ट्वीटमुळे राजकीय रंग आला आहे. चाकणकर यांनी अंतराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्वीट केलं असून यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यावर टीका केली आहे.

"आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 'शवासन' करायला लावणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." असं रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी योग त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

Tags:    

Similar News