राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरण्याची लागण झाल्याचं समोर येत आहे.(Governor Koshyari Covid Positive) सध्या त्यांना मुंबईतील रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांच्यासोबत जास्त आमदार नसल्याचा दावा शिवसेना आणि इतर नेते करत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३४ आणि अपक्ष सात असे एकूण ४१ आमदार असल्याचे उघढ झाले आहे. 41 आमदारांमध्ये दोन महिला आमदार देखील सहभागी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना सुरतमधून विमानामार्गे गुवाहाटीला नेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आज राज्यपालांना भेटण्याची शक्यता देखील वर्तवली जात असताना आता राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरण्याची लागण झाल्याची झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले आहे.
आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात काय घडणार किंवा आता राज्यपालांची सूत्रे दुसऱ्या कोणत्या राज्यातील राज्यपालांकडे दिली जातो का हे सर्व पाहणं महत्वाचे ठरणार आहे.