,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत असताना "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी निघाले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही" असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यावर समाज माध्यमांवरून टीका होत आहे. यावर आता राज्याच्या माजी मंत्री, काँग्रेस नेत्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावर वक्तव्य केल आहे.
दरम्यान यावर माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रीया दिली आहे त्या म्हणाल्यात की.. सातत्याने कुरघोडी करण्याची सवय असलेल्या या महोदयांची लवकरात लवकर पाठवणी करावी, अशी मागणी माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून येथे जगभरातील जनता आनंदाने नांदते आहे. संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावते. त्यामुळे ज्या व्यक्तीला महाराष्ट्राबद्दल आपुलकी, प्रेम नाही ती व्यक्ति त्या राज्याचे भले कसे काय करणार असा प्रश्न माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर उपस्थित केला आहे. अशी प्रतिक्रीया त्यांनी समाजमाध्यमांना दिली.