"जो सरकार अपनों के प्रति संवेदना नही प्रकट कर सकती, भला उस सरकार के साथ रहकर क्या करना है"
सरकार विरोधात आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या हरसिमरत कौर सभागृहात गरजल्या
माजी केंद्रीय मंत्री आणि अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी कायद्यांबद्दल बोलताना केंद्र सरकार असंवेदनशील आणि अहंकारी असल्याचा आरोप केला आहे. "लॉकडाउन काळात जेव्हा लोक घरी शांत होती तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन जाणकारांशी कोणतीच चर्चा न करता हा कायदा आणला गेला." असं देखील हरसिमरत यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. मात्र राष्ट्रपतींच्या भाषणात शेतकऱ्यांविषयी एक ओळ देखील नसावी खेदाची बाब असल्याचं देखील हरसिमरत यांनी म्हटलं आहे.
हरसिमरत यांनी याच कृषी कायद्यांविरोधात आपल्या सप्टेंबर 2020 ला आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता.