"गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्या"
खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा एकच उपाय सध्या सोमर आहे. त्यामुळे सुरुवातीला ही लस फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचं जाहिर करण्यात आलं. या लसीकरणात गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा प्राधान्य द्यावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी केली आहे.
या संदर्भातील ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं असून यात त्यांनी "कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असतानाही गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचविण्यासाठी कर्मचारी कार्यरत आहेत.त्यांना व गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे.केंद्र सरकारने नुकतेच लसीकरणात प्राधान्यक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य राज्य सरकारांना दिले आहे. हे लक्षात घेता गॅस कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य देण्याचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती." असं म्हटलं आहे.