बेवड्यांचं सरकार ? विद्या चव्हाण भडकल्या
तुमचा इतिहास तुमचं खर रूप दाखवतो! सता परत मिळणार नाहीच पण सभ्यतेचा बुरखाही गळून पडलाय विद्या चव्हाण देवेन्द्र फडणवीस यांच्यावर भडकल्या..;
महाविकास आघाडी सरकारला बेवड्यांची जास्त चिंता आहे. सरकारनं गरिबांचा घास हिसकावून घेतला आहे. अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर माजी आमदार विद्या चव्हाण यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. "तुमचा इतिहासच तुमचं खरं रूप दाखवतो, सत्ता परत मिळणार नाहीच पण सभ्यतेचा बुरखा ही गळून पडलाय" असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी समाचार घेतला आहे.
काल देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना बोलताना महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी घोटाळेबाज आणि अत्याचारी असल्याचं म्हणत, हे सरकार शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता करते. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 मॅच सुरू आहे. आणि या दोन्ही टीम यांच्याच असून दोघे हवातितका भ्रष्टाचार करत आहेत. असा आरोप केला व त्यानंतर बोलताना त्यांनी 'शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार संवेदनहीन आहे. या महाराष्ट्रात बेवड्यांचे सरकार आलं त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं त्यांचं हे वक्तव्य बरोबर असल्याचे दिसून येत असल्याचं फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याचा विद्या चव्हाण यांनी ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे. विद्या चव्हाण यांनी काय ट्विट केले आहे ते पाहूयात...
"अहो फडणवीस जी महाराष्ट्राचे ५ वर्ष मुख्यमंत्री होता ! शब्द वापरतांनातरी भान ठेवा ! "बेवडयांच" सरकार!! तुमचा इतिहास तुमचं खर रूप दाखवतो! सता परत मिळणार नाहीच पण सभ्यतेचा बुरखाही गळून पडलाय !!!
हे देखील वाचा..
सावधान; झटपट लोनच्या मोहाने चिनी लोन अँप वापरत असाल तर बसेल मोठा झटका..
तीने सहज जीन्स वर काढली डिझाईन आणि मिळाले दहा लाख लाइक्स