महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालिनी चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये औषध उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज रात्री साडेसात वाजता पुणे येथील हॉस्पिटल मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.