महिलांकडून शौचालय वापरासाठी जबरदस्तीने पैसे; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Update: 2021-12-23 03:18 GMT
महिलांकडून शौचालय वापरासाठी जबरदस्तीने पैसे; राज्य महिला आयोगाने घेतली दखल
  • whatsapp icon

पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी ST स्टँडवरील सुलभ शौचालयात परप्रांतीय पुरुष कर्मचारी महिलांकडून शौचालय वापरासाठी जबरदस्तीने पैसे घेत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे आली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत चाकणकर यांनी आज एक पत्रक काढून या संदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे जिल्ह्यातील मंचर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ST स्टँडवर सुलभ शौचालयातील परप्रांतीय पुरुष कर्मचारी हे महिलांकडून शौचालय वापरासाठी जबरदस्तीने पैसे घेणे, पैसे न दिल्यास त्यांना शिविगाळ करून त्यांना शौचालयाचा वापर करण्यापासून रोखत असल्याची तक्रार आयोगाकडे आली होती. या प्रकारचे गांभीर्य ओळखत रुपाली चाकणकर यांनी राज्यातील सर्वच ST स्टँडवर महिला शौचालयाच्या ठिकाणी महिला कर्मचारी असाव्यात व मंचरसारखे प्रकार राज्यात इतरत्र कुठेही घडू नये यासंदर्भात दक्षता घेण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत.

Tags:    

Similar News