अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका व्यक्तीने बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून दोघेही कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत. रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास एका कॉलरने रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका बॅगध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ताबडतोब बॉम्बशोधक पथक, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात सुमारे १५० लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे पोलीस पथकाने प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची आणि प्रवाशांची तपासणी केली.मात्र पोलिसांना स्टेशन परिसरात काहीही आढळून आले नसल्याने पोलिसाने कंट्रोल फोन करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध सुरू करत दोन जणांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले ते विचारपूस केली असता तू फेक कॉल त्यांनी केल्याची कबुली या आरोपीने दिली पोलिसाच्या माहितीनुसार अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती हे दोघे तो परिसरात राहणार असून अंबरनाथ मध्ये राहणारे आपल्या नातेवाईक कडे भेटण्यासाठी आले होते रात्री साडेबाराच्या सुमारास स्टेशनवरून घरी परतत असताना या दोघांनी पोलीस कंट्रोल रूमला फेक कॉल केला होता. साध्य कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गाडीत बॉम्ब असल्याची ती माहिती देत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणे व पोलिसांना अडचणीत कांद्याचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे
अविनाश आंधळे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन)