एकनाथ शिंदेंचा खुलासा भाजप नाही तर ही महाशक्ती आहे पाठीशी..

Update: 2022-06-24 05:30 GMT

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हे सगळं होत आतांना सर्वत्र एकच चर्चा आहे ती एकनाथ शिंदे यांच्या काल समोर आलेल्या व्हिडिओची, या व्हिडिओमध्ये ते आपल्या पाठीमागे एक राष्ट्रीय पक्ष आहे तो एक मोठी महाशक्ती असल्याचं सांगत आहेत. तर ही महाशक्ती कोणती? भाजप तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. या सर्व प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते आज बोलत होते यावेळी त्यांना नक्की कोणती महाशक्ती तुमच्या पाठीशी आहे? असा प्रश्न केल्यावर त्यांनी आमच्यासोबत बाळासाहेबांची व आनंद दिघे साहेबांची महाशक्ती पाठीशी असल्याचे म्हंटले आहे.

काल समाजमाध्यमांवर एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ समोर आला. त्या व्हिडिओ मध्ये ते आपल्या सोबत असलेल्या आमदारांना मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना त्यांनी, आता आपलं जे काही सुख दुःख आहे ते एकच आहे. काहीही असेल तर आपण एकजुटीने सामना करू. विजय आपलाच आहे. तुम्ही म्हणालात की तो राष्ट्रीय पक्ष आहे, ते महाशक्ती आहेत. त्यांनी पाकिस्तानला हादरवलं. त्याच पक्षाने मला सांगितलं आहे की तुम्ही घेतलेला निर्णय देशातील ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काहीही लागलं तर कधीही कमी पडणार नाही. याची प्रचिती आपल्याला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा सर्वांना येईल, असं एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सांगत होते. तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेली महाशक्ती कोणती? यावर त्यांनी बाळासाहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची महाशक्ती माझ्या पाठीशी असल्याचं म्हंटले आहे..

Tags:    

Similar News