"पंकजा मुंडे यांनी आता वाट न पाहता.." एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी काल "मंत्रीपदासाठी मी पात्र असल्याचे वरिष्ठांना वाटत नसेल." असं वक्तव्य केलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांची नाराजी सर्वांसमोर उघड झाली. खरतर मागच्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडेंना वरिष्ठानकडून डावलले जात असल्याची चर्चा होते. विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळणार आल्याचे म्हंटले जात होतं मात्र त्यावेळी देखील त्यांना डावलण्यात आलं. त्यानंतर अनेक पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाराजी उघड बोलून दाखवली. आता परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात देखील पंकजा मुंडे यांना स्थान निश्चित असल्याचे म्हटले जात होते. मात्र यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. आता हे जे सगळे प्रकार घडले त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कालच्या वक्तव्यानंतर त्या नाराज आल्याची एकच चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबावर वारंवार अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबासोबत वारंवार अन्याय होत असल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आता वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा आरोप करताना सुरू झाले असून नवीन चर्चेला उधाण आले आहे.