Constitution expert Dr. Anant Kalse's analysis : कुणाचा व्हीप खरा, कुणाचा खोटा ? शिवसेना की शिंदेसेना
एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता विधिमंडळात सुरू झाला आहे. १६ बंडखोर आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. तर दुसरीकडे दोन तृतीयांश बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेच आता शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या लेटर हेडवर विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. पक्षाचा व्हीप झुगारला म्हणून शिवसेनेच्या १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यामध्ये केली आहे. कुणाचा व्हीप खरा, कुणाचा खोटा? शिवसेना की शिंदेसेना, पहा घटनातज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांचे विश्लेषण…